HEADLINE

Breaking News

प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.






आनंद मनवर 

रायगड जिल्हा प्रतिनिधी 


पाली  -  प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पडसरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शाळेत मोठ्या उत्साहाने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला मुलींनी पाळणा गीत गाऊन नृत्य सादर केले. विध्यार्थ्यानी प्रथमता आपले आपले मनोगत व्यक्त केले. त्या नंतर शाळेतील मुख्याध्यापक (माध्यमिक )श्री. संदीप शिंदे सर यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराज यांचा महाप्रतापी कार्याची ओळख करुन दिली. व विद्यार्थी भावी जीवनात शिवचरित्र वाचून समाजात कसा स्वतःला सिद्ध करू शकतो अशी अनमोल माहिती आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी केले. त्या नंतर प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी ढोपे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करुन जीवनात आपण शिवाजी महाराज यांचा विचाराची प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा मंत्र त्यांनी विध्यार्थ्यांना दिला. आज रोजी शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, भाषणे, नृत्य. इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाला शिवव्याख्याते, पुरोगामी विचाराचे समाज सुधारक. आदर्श शिक्षक श्री. राजेश गायकवाड सर  यांचे शिवचरित्रावर व्याख्यान ठेवण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश महाडिक सर यांनी केले. या कार्यक्रमाला माध्यमिक  मुख्याध्यापक श्री संदीप शिंदे, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ मीनाक्षी ढोपे, शाळेतील शिक्षक, श्री सुधीर क्षीरसागर शिक्षिका सौ दिपाली घरट ,सौ. श्वेता जाधव, सौ मेघना भडवळकर सौ. गार्गी चोरगे तसेच इतर कर्मचारी श्री किरण माळी श्रीमती मनीषा इंगळे श्री रमेश चोरगे श्री मयूर सूर्यवंशी श्री जानु दोरे  इत्यादी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत