HEADLINE

Breaking News

रायगड जिल्हा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा परळी चा लगोरी खेळात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक.




आनंद मनवर 

रायगड जिल्हा प्रतिनिधी 


परळी - साधागड तालुक्यातील मुख्य गाव परळी येथे जिल्हा परिषदेची ISO मानांकित आदर्श डिजिटल शाळा आहे. विशेष म्हणजे इतर शाळेत मुलांची वणवा असला तरी या शाळेत विध्यार्थी संख्या चांगली आहे. याचे कारण इथले केंद्र प्रमुख,शिक्षक.आहेत या शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात या शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुहास भुसे सर खुप खुप मेहनत घेतात शाळेला नेहमी अपडेट ठेवतात. तसेच शाळेतील आदर्श व उपक्रमशील शिक्षक श्री. शहानवाज शेख सर हे सुद्धा या शाळे करीता अपार मेहनत घेतात विविध योजना राबवण्या करीता सतत सक्रिय असतात. याचाच अनुभव म्हणजे नुकत्याच रायगड जिल्हा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत परळी केंद्रशाळा सहभागी होती. त्यात या शाळेतील विध्यार्थ्यांना रायगड जिल्हा परिषद तर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय लगोरी या खेळात लहान गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्या मुळे या शाळेचे कौतुक सर्वत्र होत आहे तसेच शुभेच्छाचा  वर्षाव होत आहे. या यशामध्ये केंद्र प्रमुख श्री. घनशाम हाके साहेब यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन व योगदान आहे. या शाळेचा यशा बद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. सादुराम बांगारे साहेबांनी सुद्धा शाळेला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. शाळेचा यशा मध्ये शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ शिंदे मॅडम, सौ जगताप मॅडम यांनी मोलाची साथ देऊन मेहनत घेतली. सदर शाळेवर विध्यार्थी, पालक,गावकरी.हे कौतुक करुन स्तुतीसुमने उधळवीत अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत