प्रकाश भाऊ देसाई यांच्या माध्यमातून हरिओम सतनाम वारकरी संप्रदायास चांदीच्या पादुकांची भेट
पाली / वाघोशी (अमित गायकवाड ) प्रकाश भाऊ देसाई यांच्या माध्यमातून हरिओम वारकरी संप्रदायास चांदीच्या पादुकांचे भेट वाघोशी येथे देण्यात आले. दिनांक 25 रोजी ह भ प दिलीप महाराज देशमुख यांचे निवासस्थानी हभप शंकर आप्पा देशमुख यांच्या समाधी शेजारी हा कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी वाघोशी ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश भाऊ यांचे स्वागत करण्यात आले .या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांनी मनोगत व्यक्त करताना प्रकाश भाऊ यांच्या कामाचे कौतुक केले . त्यांनी सांगितले की प्रकाश भाऊ हे नेहमी समाजाशी बांधिलकी जपत असतात कोणी दवाखान्यात असेल तरीही भाऊ त्याला आर्थिक मदत करतात . प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात . तर वारकरी संप्रदायाच्या वतीने हभप दिलीप महाराज देशमुख यांनी प्रकाश भाऊंचे आभार मानताना सांगितले की , आम्ही भाऊंकडे पादुका मेळाव्यात अशी भावना व्यक्त केली आणि भाऊंनी क्षणाचाही विलंब न लावता आमच्या भावना कबूल करून आम्हाला आज पादुका भेट केल्या त्यामुळे आम्ही त्या भाऊंचे आभार मानतो व नेहमी भाऊ सोबत राहू असे आश्वासित करतो . या कार्यक्रमाला भाजपाचे रायगड जिल्हा मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष दीपक पवार , सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे , पाली शहर अध्यक्ष सुशील शिंदे , प्रधान देशमुख , अशोक देशमुख , कासार नाना , उत्तम देशमुख , शशिकांत देशमुख , नितीन देशमुख, दिलीप कोलाटकर , किसन देशमुख , सतीश देशमुख , नथुराम गणपत देशमुख , रवींद्र देशमुख, प्रसाद देशमुख , अनंत शिवराम देशमुख , विलास देशमुख संजय देशमुख , विनायक देशमुख, कृष्णा राम देशमुख , दिनेश देशमुख , अभिजीत देशमुख , मयूर देशमुख , कैलास देशमुख आदींसह तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष व वारकरी मंडळ तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत