श्री सेवकांकडून सुधागड पाली मध्ये स्वछता मोहिमेत शेकडो टन कचरा संकलित.
आनंद मनवर
रायगड जिल्हा प्रतिनिधी
पाली - दिनांक 5 मार्च रोजी डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता करण्यात आली.या मध्ये पाली बाजारपेठ, पंचायत समिती, वनविभाग ऑफिस व इतर सर्वत्र स्वच्छता व साफसफाई करण्यात आली. थोरनिरूपणकार, महाराष्ट्र भूषण. तीर्थरूप डॉ नानांसाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे अवचित्त साधून पाली शहरात स्वच्छता मोहीम श्री सदस्य यांच्या मार्फत राबविण्यात आली. या मध्ये शेकडो तरुण, आणि सर्व श्री सदस्य यांनी सहभाग घेतला. निरूपण कार धर्माधिकारी साहेब यांनी जे समाजात पेरले ते अद्वितीय आहे. सर्व समाजात त्यांनी लोकांना ईश्वरांचा नाम स्मरणाराबरोबर लोकांना स्वच्छता, सामाजिक बांधिलकी बरोबर जुळून त्यांना अध्यात्मतेकडे वळवले समाजात त्यांचे मोलाचे स्थान निर्माण केले. आज त्यांचा वारसा अनेक युवा लोक पुढे नेत आहेत. त्यांचे हे कार्य महान आहे. समाजात आदर्श निर्माण करणारे आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत