HEADLINE

Breaking News

शेठ. ज. नौ.पालीवाला महाविद्यालयामध्ये स्क्रुटीनी मूल्यमापन सत्र संपन्न...



पाली / वाघोशी ( अमित गायकवाड )  सुधागड एज्युकेशन सोसायटीचे शेठ. ज. नौ. पालीवाला महाविद्यालय पाली, तालुका सुधागड व मुंबई विद्यापीठ रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्कुटीनी मूल्यमापन सत्र दिनांक 3 मार्च 2025 रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर लहूपचांग उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. रवींद्रजी लिमये - उपाध्यक्ष सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली, सुधागड, मा. ग.रा म्हात्रे - संचालक- सुधागड एज्युकेशन सोसायटी,पाली उपस्थित होते. तर मूल्यमापन सत्रासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.तुळसीदास मोकल - रायगड जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना विभाग मुंबई विद्यापीठ, मा. डॉ. प्रवीण गायकवाड - विभागीय समन्वयक, मा. डॉ. दत्तात्रय हिंगमिरे, व रायगड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन, मुंबई विद्यापीठ गीत, व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या लक्ष्यगीताने झाली. त्यानंतर सुधागड एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ,संस्थापक, अध्यक्ष, शिक्षणमहर्षी, कर्मयोगी स्वर्गीय दादासाहेब लिमये यांनी केलेल्या कार्याची यशस्वी वाटचाल, यावरती प्रकाश टाकला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अनिल झेंडे यांनी सुरुवातीला मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला स्क्रुटीनी मूल्यमापन सत्र आयोजित करण्यासाठी संधी दिली याबाबत विशेष आभार मानले . त्याचबरोबर महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विविध कार्यक्रमांमध्ये असणारा सहभाग, विविध उपक्रम व राष्ट्रीय सेवा योजना विभाग याची भूमिका स्पष्ट केली.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा.रवींद्रजी लिमये यांनी मार्गदर्शन करताना सुधागड एज्युकेशन सोसायटीची यशस्वी वाटचाल, आदिवासी खेड्यापाड्यांपर्यंत शिक्षणाची दारे खुली करण्यामध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीची भूमिका, कर्मयोगी, शिक्षण महर्षी, दादासाहेब लिमये यांनी सुधागड तालुक्यामध्ये केलेले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्य, राष्ट्रीय सेवा योजना विभागामधून होणारे वेगवेगळे उपक्रम, व्यक्तिमत्व विकासात राष्ट्रीय सेवा योजना विभागाची भूमिका, आपल्या मनोगतामधून व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा.ग.रा. म्हात्रे यांनी उपस्थित सर्व कार्यक्रम अधिकारी यांचे कौतुक केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागांमधून असे जनसेवेचे विविध उपक्रम आयोजित केले जातात याकरता त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी उपस्थित मा. तुळसीदास मोकल यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील दैनंदिन व विशेष कार्यक्रम याची रूपरेषा, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कागदपत्र तयार करत असताना घ्यावयाची काळजी, मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, व्यक्तीच्या विकासात राष्ट्रीय सेवा योजना विभागाची भूमिका, रायगड जिल्ह्यामध्ये शेठ ज. नौ पालीवाला महाविद्यालयाचा असणारा सहभाग, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्वरूपात उपस्थित डॉ. सुधाकर लहुपचांग यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग हे स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभाग होण्याची संधी देते असे मत मांडले. प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या कामकाजाचा लेखाजोखा हा तयार करून त्याचा अहवाल उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, उत्कृष्ट स्वयंसेवक याकरता विद्यापीठात जमा करावा असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण यशस्वी नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल झेंडे, डॉ. एस.ए. पाटील, श्री लिनताज उके,प्रा.संदेश गावडे व स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्क्रुटीनी मूल्यमापन सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील एकूण 100 कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. डाॅ.अंजली पुराणीक, प्रा. एस .व्ही पाथरकर, प्रा.डी.आर. शिवपुजे, प्रा.एन.एन.पाटील,प्रा. संदेश गावडे, डॉ. जालिंदर काळकुटे, डॉ. भारती आरोटे, प्रा.विशाखा मानकामे, प्रा.दिपाली बांगारे , प्रा.भक्ती साजेकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक संदेश गावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस.पाटील यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत