आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक लढ्यांचा साक्षीदार हरपला ; वाघोशी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नथू गायकवाड यांचे निधन.
पाली: सुधागड तालुक्यातील मौजे पंचशील नगर वाघोशी येथील आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधागड तालुका बौद्धजन पंचायत र.जि. नं. 2756 चे जेष्ठ कार्यकर्ते व ग्रुप नं. 06 चे माजी अध्यक्ष नथू यशवंत गायकवाड नुकतेच अल्पशा आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी आणि धम्म चळवळीतील एक ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक लढयांचा साक्षीदार हरपला असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया त्यांच्या अंत्ययात्रेस उपस्थित मान्यवरांनी दिली. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळावू होता, ते लहान असो की मोठा सर्वांचा आदर तिथ्य करीत असत. सर्वांच्या सुख दुःख व अडीअडचणीत ते सहभागी होत असत. आदिवासी बांधव बहुजन समाजात त्यांचे प्रस्थ व जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी आपली मुले व मुलींना चळवळ व सामाजिक कार्याची आवड निर्माण करून देत आदर्शवत जीवनशैलीची शिकवण दिली. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला गायकवाड, मुलगा दिनेश गायकवाड, मुलगा मिलिंद गायकवाड, मुलगी अनिता ओव्हाळ, कल्पना कांबळे तसेच सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत नथु गायकवाड यांचे पुण्यानुमोदन व शोकसभा दि. 3 ऑगस्ट 2025 रविवार रोजी पंचशील नगर वाघोशी येथील राहत्या घरी होणार आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत