माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड मध्ये समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन
सुधागड: (राहूल गायकवाड) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मौजे जाभूलपाडा येथे शिवसेनेच्या वतीने समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आला. नवनिर्माण चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून सुधागड तालुक्यात गुरुकुल चालविले जाते तसेच संस्थेच्या माध्यमातून समाज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार असणाऱ्या मुलांचे शिक्षण होत आहे. नवनिर्माण चॅरिटेबल संस्थेला परळी शिवसेना शाखा प्रमुख मा. उदयजी धुमाल तसेच ढोकशेत शाखा प्रमुख मा. सुधीरजी देसाई यांच्या वतीने रोख रक्कम 5000/रु ची आर्थिक मदत करण्यात आली. त्याचबरोबर शालेय वह्या, पुस्तके यांचं देखील वाटप करण्यात आले.
या प्रसंगी रायगड जिल्हा शिवसेना (उ. बा. ठा.) चे संपर्क प्रमुख मा. विष्णुभाई पाटील, शिवसेना जेष्ठ नेते, मा. रविदादा खंडागळे, शिवसेना नेते मा. नारायणजी दळवी, युवा नेतृत्व, मा. राजेश परदेशी,मा, नवनाथ आवासकर, संतोषजी देशमुख, नागेश देशमुख, गिरीश भूरे, प्रभाकर खंडागळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत