उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुधागड तालुक्यात शैक्षणिक साहित्य वाटप
परळी/ सुधागड : (राहुल गायकवाड) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उ.बा.ठा पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुधागड तालुक्यातील पोटलज बुद्रुक व डुबेवाडी येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिवसेना सुधागड तालुक्यात यांच्या कडून शाळेय वस्तूचे वाटप करण्यात आले.
सुधागड तालुक्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पाऊस पडत आहे यामुळे येथील जनतेचे रोजगाराचे स्त्रोत कमी झाले आहे यामुळे शाळेतील विद्यार्थ्यास शाळेय साहीत्यची कमी भासू नये या करीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करत एक सामजिक उपक्रम राबविण्यात आला.
ह्या प्रसंगी मनोज जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत,तालुकाप्रमुख दिनेश चिले,विभागप्रमुख किशोर दिघे,सुधीर धनावडे,शाखाप्रमुख बामगुडे आणि ग्रामस्थ व दोन्ही शाळांच्या शिक्षिका उपस्थित होत्या

कोणत्याही टिप्पण्या नाहीत