विधानभवनावर गायरानधारकांचा राज्यव्यापी मोर्चा, पेण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चाची जोरदार तयारी
वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विधानभवनावर गायरानधारकांचा राज्यव्यापी मोर्चाचे गुरुवार दिनांक २० जुलै २०२३ रोजी आयोजन करण्यात आले आहे. मोर्चा भव्य दिव्य स्वरूपात होण्यासाठी त्यासंदर्भात गावोगावी बैठकांचे आयोजन सुरू झाले आहे.
वंचित बहुजन आघाडी रायगड (उत्तर) जिल्हाअध्यक्ष प्रदीप ओव्हाळ, जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या वतीने मोर्चाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. तसेच पेण तालुक्यातील विविध गावात मोर्च्याचे यशस्वितेसाठी सर्व अतिक्रमण धारक गायरान जमीन धारक व विविध समाजाचे अध्यक्ष यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले जात आहे. बैठकीत अतिक्रमण धारकांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी विश्वास देण्यात आला.
मोर्चाच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला सचिव प्रभाकर शिंदे, कार्याध्यक्ष सुरज गायकवाड, आयटी प्रमुख प्रतीक सुतार, निलेश ठाकूर, संपर्कप्रमुख प्रफुल मोरे, संघटक रोहित जाधव, संघटक अजय सोनवणे, सखाराम मोरे, दीपक सोनवणे, रमेश गायकवाड, सिकंदर जयस्वाल तसेच महिला आघाडी शशिकला गायकवाड, छाया मोरे, शैला गायकवाड, यमुना गायकवाड रोशनी गायकवाड कांताबाई शिंदे, नीलम गायकवाड, सुलभा आमले, लताबाई शिंदे, वंदना आव्हाड या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत