पावसाचं थैमान: रेड अलर्टनंतर रायगड जिल्हा प्रशासनाकडून शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
रायगड : गेले काही दिवस गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा कोकणात जोरदार बरसत आहे. मागील दोन दिवसांपासून कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. रायगड जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रायगड जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शाळा कॉलेजला आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महाड तालुक्यातील सावित्री नदीकाठी राहणाऱ्या १६ कुटुंबांना शहरातील एका जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत