पेण एक्सिस बँकेत तारण ठेवलेले २८ लाखांच्या दागिन्यांची अफरातफर;महिला बँक कर्मचारी निलंबित.
पेण एक्सिस बँकेत तारण ठेवलेले २८ लाखांच्या दागिन्यांची अफरातफर; महिला बँक कर्मचारी निलंबित.
पाली: (प्रशांत गायकवाड ) पेण ऍक्सिस बँकेत तारण ठेवलेले २८ लाखांच्या दागिन्यांची अफरातफर झाल्याची घटना घडली आहे. बँक महिला कर्मचारी प्रीती सुर्वे ह्यांनी तारण ठेवलेल्या तीन ग्राहकांचे दागिन्यांच्या ठिकाणी बनावट दागिने ठेऊन असली दागिने मुथुट फिनिकॉर्म व आय. आय. एफ. एल. बँकेत २१ लाख १० हजार ९१७ रुपयांना गहाण ठेवले होते. या घटनेने पेण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. प्रिती सुर्वे यांच्या विरोधात पेण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याची अधिक तपासणी पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास मपोसई / एम. जे. घाडगे करत आहेत. या बाबत ऍक्सिस बँक मॅनेजर यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ करण्यात आली. यातील आरोपी या आधी बँक ऑफ बडोदा मध्ये पेन शाखेच्या प्रमुख असताना, कर्ज वाटपात अफ्रातफर केली असता ०६ महिन्यांसाठी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना कायम स्वरूपी काढून टाकण्यात आले होते. घडलेल्या गुन्ह्या संदर्भात पेण पोलीस एम. जे घाडगे साहेब अधिक तपास करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत