HEADLINE

Breaking News

रसायनी कष्टकरी नगर येथे २४ जुलै १९८९ च्या पुरातील मृतांना वाहण्यात आली श्रद्धांजली


रसायनी: (विश्वनाथ गायकवाड) - सोमवार २४ जुलै २०२३ रोजी कष्टकरी नगर येथे सालाबादप्रमाणे १९८९ च्या महापुरात वाहून गेलेल्या मृतांच्या स्मृती पित्यार्थ  कष्टकरीनगर येथे स्मृती स्तंभ बांधण्यात आला असून दरवर्षी २४ जुलै रोजी या स्तंभास विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच इर्शालवाडी येथे दरड कोसळून मृत पावलेल्या लोकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

              यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यावेळच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. मृत्यूशी झुंज देऊन खोल पाण्यात एकमेकाच्या आधाराने मानवी साखळी करून एकमेकांना वाचवून आम्ही वाचलो असे मत व्यक्त केले. या वेळी विश्वनाथ गायकवाड यांनी अभिवादन करून आपण गावात स्वच्छ्ता,आणि विकासकामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उत्तम प्रकारे झाल्याचे सांगितले. आपण सर्वांनी सलोख्याने व एकीने राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.

            या वेळी मा.उप सरपंच विश्वनाथ गायकवाड,काका गायकवाड, दादासो आटपाडकर, नामदेव जाधव सुनील राठोड, अशोक सोनवणे, नजमा साखरकर यांच्या हस्ते स्तंभाचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत