HEADLINE

Breaking News

रक्षाबंधनाच्या निमित्ताने वावेघर येथील रस्ते दुरुस्त ; जगदीश पवार यांचा पुढाकार

 

|रसायनी| |विश्वनाथ गायकवाड|

रसायनी: वावेघर येथील खड्डेमय रस्ते पनवेल पंचायत समिती मा. सदस्य जगदीश पवार यांनी आपल्या स्वखर्चाने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने खड्डे बुजवण्याचे  काम  केले आहे.यावेळी  त्यानी त्यांची स्वत:ची जेसीबी व खडी व माती टाकून रस्ते  रक्षाबंधाच्या सणाच्या निमित्ताने एखाद्या भाऊ बहिणीला अपघाताला कारणीभूत ठरू नये म्हणून एका भावाने पुढाकार घेऊन रस्ते चकाचक करण्याचे काम केले आहे. जगदीशदादा पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल रसायनी पंचक्रोशीतील वाहन चालकांना, विद्यार्थ्यांना कामगारांना, रिक्षचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते चंदर माने, युवा नेते सुहास माळी पुरोगामी युवक संघटनेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष भास्कर गाताडे, निष्ठावान युवा नेतृत्व मधुकर तांडेल, सावळे गावचे युवक अध्यक्ष चेतन म्हात्रे, युवक उपाध्यक्ष मदन मते तसेच वावेघर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत