चक्की फ्रेश आटा की रबर? ग्राहकाचा फॉर्चून कंपनीला सवाल, ग्राहक न्यायालयाकडे लेखी शिकायत, कंपनी साईटवरही ऑनलाईन तक्रार.
सुधागड (जि. रायगड) / निवास सोनावळे :- सध्या टिव्ही, वृत्तपत्रातून विविध प्रॉडक्ट्सच्या जाहिराती पाहून खरेदी करण्याकडे ग्राहकाचा कल असतो. परंतु कधी-कधी अशा सामानांची खरेदी केल्यावर मनशांती, आनंद मिळण्यापेक्षा मानसिक त्रास सहन करावा लागत असतो. अशीच एक घटना निलेश सोनावळे यांच्यासोबत घडली. बाजारातून रेडीमेट पीठ विकत आणले पण जेव्हा पोळी बनविण्यासाठी पीठ मळायला पाणी टाकले तर पीठ रबरासारखे ताणले जात असल्याची तक्रार ग्राहकाने 'केपी न्यूज'शी बोलताना व्यक्त केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कवेळे येथील निलेश सोनावळे यांनी 27 ऑगस्ट 2023 रोजी मे विनोदकुमार दिलीपकुमार आणि कंपनी जनरल मर्चंट आणि कमिशन एजंट यांच्याकडून फॉर्चून कंपनीचे चक्की फ्रेश आटाची 6 पाकीटे 1200 रूपयांना विकत घेतली. 340 नंबरच्या बिलचे निलेश सोनावळे यांनी ऑनलाईन पेमेंट केले. दरम्यान, सोनावळे यांनी पीठ घरी आणल्यानंतर पोळ्या बनविण्यासाठी पीठ मळायला सुरूवात केली.
पिठात पाणी टाकल्यानंतर स्वत:हून दळून आणलेल्या पिठापेक्षा वेगळ्या पध्दतीचा आटा दिसून आला. हा आटा रबरासारखा ताणला जात असल्याचे दिसून आले. याप्रकरणी सोनावळे यांनी कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली असून लवकरच तालुका व जिल्हा ग्राहक न्यायालयात लेखी तक्रार करणार असल्याची माहिती ग्राहक निलेश सोनावळे यांनी दिली.
याबाबत बोलतांना निलेश सोनावळे म्हणाले की, मी फॉर्चून कंपनीचे चक्की फ्रेश आटाची 6 पाकीटे विकत घेतली. परंतु सदर आटा रबरासारखा ताणला जात जात होता. त्यामुळे मी दुकानदार व कंपनीकडे तक्रार केली आहे. ज्याप्रमाणे जाहिरातील सांगितले जाते तसे मला दिसून आले नाही तरी कंपनीने मला नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा मी तालुका व जिल्हा ग्राहक न्यायालयात लेखी तक्रार करेन, असेही त्यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत