पनवेल तालुक्यातील गायरान धरकांकडून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा मोठा मानसन्मान
वंचित आणि शोषितांचे आधार स्तंभ बहुजनांचे हृदयसम्राट श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जुलै 2023 रोजी मुंबईत गायरान धारक, शासकीय, महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारक यांच्या न्याय हक्कासाठी महामोर्चा झाला होता. या गायरान जमीनधारकांचा राज्यव्यापी मोर्चाच्या यशा मुळे पनवेल तालुक्यातील अनेक गोरगरीब गायरान धारक, शासकीय, महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारक यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडून सदर विषयाला वाचा फोडून श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांनी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिले आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पनवेल तालुक्यातील वंचित व शोषित गायरान धरकांकडून मोठा मानसन्मान करण्यात आला. तसेच या मोर्चासाठी पनवेल तालुक्यातील प्रत्येक घरापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवून सर्व गायरान धरकांना एकत्र करून जागरूक करण्यापासून, सदर ऐतिहासिक मोर्चाचे साक्षीदार करून घेण्यापर्यंत प्रयन्त करणाऱ्या वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष मा. दिपक कांबळे साहेब यांचे दिनांक 23/08/2023 रोजी कोन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मोठया मान-सन्मानाने जाहीर सत्कार करण्यात आले. सत्कार प्रसंगी पनवेल पंचायत समिति विस्तार अधिकारी मा.विश्वास म्हात्रे साहेब, ग्राम विकास अधिकारी मा.रमेश तारेकर साहेब, पंचायत समिति माजी सदस्य मा.ज्ञानेश्वर बडे साहेब, कोन ग्राम पंचायत सरपंच मा.दिपक म्हात्रे साहेब, ग्रामपंचायत माजी सदस्य मा.गोविंद पाटील साहेब, कोन ग्रामपंचायत सदस्य मा.जीतेश शिसवे साहेब, तसेच मा.अशोक घरत, व मा.बालाराम कांबळे तसेच अनेक गायरान धारक व ग्रामस्त उपस्थिति होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत