HEADLINE

Breaking News

RTE अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त शैक्षणिक शुल्क परत करा - प्रशांत गायकवाड




        RTE अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त शैक्षणिक शुल्क परत करण्याबाबत याक एज्युकेशन पब्लिक स्कूल हाळ, खोपोली येथे वंचित बहुजन युवा आघाडी, खालापूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रायगड जिल्हा महा सचिव वैभव केदारी, खालापूर तालुका अध्यक्ष  प्रवीण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. 
        ज्या विद्यार्थ्यांचे RTE अंतर्गत प्रवेश झाले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त शैक्षणिक शुल्क घेतले गेले आहे. अशी तक्रार पालकांच्या वतीने वंचित बहुजन युवा आघाडी कडे करण्यात आली होती. आकारलेले शैक्षणिक शुल्क नियमबाह्य आहे. राज्य शासनाच्या मोफत शिक्षण हक्क कायद्या अन्वये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी हि संपुर्णतः शासनाची आहे. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत प्रवेश घेतलेला विद्यार्थ्याला गुणवत्ता यादीचे निकष पूर्ण करूनच प्रवेश मिळतो म्हणून सामान्य प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत त्या विद्यार्थ्यां प्रमाणे RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना शुल्क आकारू नये अशी भूमिका वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आली होती. शाळेच्या वतीने घेत असलेल्या अभ्यासक्रम अतिरिक्त उपक्रमाची शुल्क भरण्यास RTE अंतर्गत विद्यार्थ्यांना बंधनकारक नाही. विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात आलेले शुल्क अवाजवी असून ते तात्काळ विद्यार्थ्यांना परत करावे अशी विनंती शाळा प्रशासनास यावेळी करण्यात आली.
        सदर मागणी तात्काळ पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडी मार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच शाळेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी ठोस पाउले उचलली जातील. असे यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी खालापूर अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. यावेळी रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी, खालापूर तालुका युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड , खालापूर तालुका युवक महासचिव महेंद्र ओव्हाळ, खालापूर तालुका युवक सचिव नितीन भालेराव, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत