HEADLINE

Breaking News

पेण, सुधागड, रोहा मतदार संघाचा पुढील आमदार शेतकरी कामगार पक्षाचा - सुरेश खैरे


पाली/वाघोशी (अमित गायकवाड): पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाच्या पुढील आमदार हा शेतकरी कामगार पक्षाचा असणार. असा ठाम विश्वास रायगड जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांनी दर्शविला आहे. सुधागड तालुक्यात नुकताच शेकापचा 76 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी आमच्या प्रतिनिधी यांनी सुरेश खैरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पेण, सुधागड, रोहा हा मतदार संघ नेहमीच शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. यापूर्वी मोहन भाई व धैर्यशील दादा यांच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाने अनेक वेळा या मतदारसंघाला आमदार दिलेला आहे. मात्र या वेळेला धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने थोडाफार फरक पडेल. मात्र विशेष असा फरक पडणार नसेल नाही. कारण शेतकरी कामगार पक्षाला मानणारा फार मोठा वर्ग पेण, सुधागड, रोहा या मतदारसंघात आहे, हा पारंपरिक मतदार आहे. जो नेहमी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्या सोबत राहतो. त्यामुळे येणाऱ्या 2024 च्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्ररीत्या अथवा शिवसेनेसोबत निवडणुका लढवणार असून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचे सुरेश शेठ खैरे यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत