HEADLINE

Breaking News

मुंबई गोवा महामर्गावर माणगाव दरम्यान एसटी बस ने ट्रक ला मागुन धडक देऊन अपघात



|माणगाव| |वार्ताहर|

माणगाव : दि. १७-  मुंबई गोवा महामर्गावर गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत मौंजे रेपोली येथे सकाळीं पहाटे साडेचार च्या सुमारास एसटी बस ने ट्रक ला मागुन धडक देऊन अपघात घडले. सदर अपघातांत एक जण ठार झाला आसून आठजण गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर प्रवासीना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात इतका गंभीर आहे की एसटी बस समोरून पूर्णपणे फाटली गेलीं आहे. सविस्तर असे की मौजे रपोली येथे राजापूर ला जाणारी ST बस क्र. म 14 BT 2664 ही गोव्याकडे जाणाऱ्या ट्रक 46BB 5948 वर पाठीमागून धडक देऊन गंभीर अपघात घडला. सदर अपघात सकाळीं पहाटे 4:20 च्या दरम्यान झाला असून एक जण मृत पावला असून इतर गंभीर जखमी प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले आहे.  सदर अपघात वाहतूक कोंडी झाली होती परंतु पोलिस प्रशासनाने काही वेळातच एकेरी वाहतूक सुरु केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत