सुधागड वंचित बहुजन आघाडीच्या दणक्याने पंचायत समिती प्रशासन हादरले चंदरगाव बौद्धवाडी येथे स्मशानभूमी बांधणार
|अमित गवळे| | सुधागड |
पाली, ता. 25 (वार्ताहर): चंदरगाव बौद्धवाडी येथे स्मशानभूमी बांधून देण्याची मागणी सुधागड पाली गटविकास अधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने येथे स्मशानभूमी शेड बांधण्यात येईल असे पत्राद्वारे सांगितले आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की काही दिवसांपूर्वी जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, उपाध्यक्ष चंद्रकांत जगताप, युवा अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वात पंचायत समिती सुधागड येथे चंदरगाव स्मशानभूमी संदर्भात निवेदन देण्यात आले होते.
या निवेदनाची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी यांनी तातडीने जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंडातून चंदरगाव स्मशानभूमीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरात लवकर याची वर्क ऑर्डर देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र यावरच थांबणार नसून जोपर्यंत वर्क ऑर्डर भेटत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही. असे अमित गायकवाड यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत