HEADLINE

Breaking News

अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरे जखमी

 




अमित गवळे 

पाली, ता. 27 (वार्ताहर) गणेशोत्सवानंतर पुणे व मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांनी माणगाव विळे मार्गे पाली खोपोली राज्यमहामार्गावरून प्रवास केला. यावेळी रविवारी (ता.24) रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने आतोने हद्दीमध्ये काही जनावरांना ठोकर दिली. यामुळे हे जनावरे जखमी झाली.

   अमर यादव यांनी येथील माजी सरपंच रोहन दगडे यांना माहिती दिली. त्यानंतर दगडे यांनी पशुवैद्यकीय चिकित्सक प्रशांत वारगुडे यांना बोलावून सोमवारी (ता. 25) जखमी जनावरांवर उपचार करून घेतले. अशाप्रकारे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनचाकांमुळे जनावरांना हकनाक त्रास सहन करावा लागला.




फोटो ओळ, पाली, वाहनांच्या धडकेत जखमी झालेली जनावरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत