माणगांव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट
माणगांव: माणगांव शहरातील बंद घरावरील दरोडे, छोटी मोठी दुकाने फोडणे, भुरट्या चोऱ्या या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दि. ३१ ऑगस्टच्या रात्री १२ ते १ सप्टेंबर सकाळी ८ वा. च्या दरम्यान माणगांव बाजारपेठ मध्ये असणारे खांदाड नाक्यावर असणारे निलांबर बार तर मुंबई गोवा हायवेवर मोतीराम प्लाझा मध्ये असणारे बालाजी ऑटो स्पेअर पार्ट चे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दोन्ही ठिकाणीहुन सुमारे १७ हजाराची रोख रक्कम लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ह्या चोऱ्या चोरट्यांनी बंद शटर चे लॉक फोडून केल्या आहेत. यामध्ये निलांबर बार च्या गल्ल्यातील सुमारे २५०० ची रोख रक्कम तर बालाजी ऑटो स्पेअर पार्ट दुकानातील गोशाळा फंडासाठी ठेवलेल्या गल्ल्यातील सुमारे १२ हजार रोख रक्कम व दुकानाच्या रोजच्या गल्ल्यातील सुमारे २५०० रु रोख रक्कम लंपास केली आहे. मोतीराम प्लाझा येथील बालाजी ऑटो स्पेअर पार्ट येथील दुकानात चोरी करताना चोरटे सी सी टीव्ही मध्ये कैद झालेले आहेत.
माणगांव शहराचा विकास आणि विस्तार जसा झपाट्याने होत आहे त्यातच अश्या प्रकारच्या चोऱ्यांच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे तर दिवसा ढवळ्या देखील माणगाव मध्ये लोकांना नजरबंदी करून पुढे मर्डर झाला आहे, तुमचे दागिने काढून आमच्याकडे द्या ते सुरक्षित राहतील असे सांगून देखील लोकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यावर पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रित करून रात्रीच्या गस्ती, बिट मार्शल चे राउंड, दिवसा दामिनी पथकाचे राउंड हया गोष्टीमध्ये वाढ करावी त्याहून अधिक नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी माणगांव मधून जोर धरू लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत