दिघेवाडी तलावात तरुण बुडाला दोन दिवसांनी शव आले बाहेर
अमित गवळे
पाली, ता. 27 (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील दिघेवाडी येथील तलावामध्ये सोमवारी (ता.25) सायंकाळी एक तरुण बुडाला. बुधवारी (ता.27) सकाळी या तरुणाचे शव सापडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील आदिवासी वाडीवरील योगेश चिंतामणी पवार वय 25 हा आपल्या दोन मित्रांसह येथील तलावात पोहण्यासाठी गेला होता. यातील एक मित्र काठावर बसला होता. तर योगेश व त्याचा दुसरा मित्र तलावात पोहण्यासाठी गेला. अर्ध्यातून दुसरा मित्र परत काठावर आला मात्र योगेश पुढे पोहत जात असतांना पाण्यात बुडाला. त्यानंतर याबाबत पाली पोलिसांना कळविण्यात आले. लागलीच पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व स्थानिक रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्र झाली असल्याने व पाण्यात जाण्यासाठी कोणतेही साधनसामग्री नसल्याने टीम मागे फिरली. त्यानंतर तहसीलदार उत्तम कुंभार यांनी लागलीच खोपोली येथील गुरुनाथ साठेलकर यांच्या रेस्क्यू टीम सोबत संपर्क साधला. मंगळवारी (ता.26) या रेस्क्यू टीमने पाण्यात योगेशला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडला नाही. अखेर बुधवारी (ता.27) योगेश पवार चे शव पाण्यावर तरंगताना आढळले.
फोटो ओळ, पाली, मृत योगेश पवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत