HEADLINE

Breaking News

RBI आणि CRISIL Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र



पाली-सुधागड- (प्रतिनिधी): RBI आणि CRISIL Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र, पाली-सुधागड मार्फत आर्थिक जनजागृती शिबिराचे आयोजन सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सव मंडळ,भोराई काॅम्प्लेक्स, भोई आळी, पाली-सुधागड येथे मंगळवार दि. ०३/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात सर्व रहिवाश्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती व त्याचा लाभ घेण्यास सहकार्य करण्यात आले, तसेच डिजिटल बँकिगमध्ये होणारे फसवणुकीचे प्रकार कसे टाळावे याबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास सौ. संजिवनी संतोष शिंदे-मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र व्यवस्थापक-सुधागड, मंडळाचे अध्यक्ष गणेश मोरे, खजिनदार स्वप्नेश शहा, सचिव संतोष शिंदे, सल्लागार ॲड. संजयकुमार शहा मंडळाचे सन्माननीय सदस्य गणेश भोरापकर, अजित खरोसे, नागेश सायगावकर, सुधीर पालकर, विलास पाटील, विशाल पाटील, अशोक नलावडे इ. सहकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत