पालीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत ; 4 जणांना घेतला चावा.
|पाली| |अमित गवळे|
पालीतील संत रोहिदास नगर येथे एक कुत्री पिसाळली आहे. या कुत्रीने मंगळवारी (ता.3) व बुधवारी (ता.4) 4 जणांना चावा घेतला आहे. यामध्ये एक महिला, पुरुष व युवकाचा समावेश आहे. या पिसाळलेल्या कुत्र्या मुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. प्रशासनाने लवकर याबाबत काही उपायोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी सांगितले की तालुक्यात पुरेशा प्रमाणात अँटी रेबीज वॅक्सिंन उपलब्ध आहेत. ज्यांना कुत्रा चावला आहे त्यांनी जवळच्या सरकारी रुग्णालयात व आरोग्य केंद्रात जाऊन अँटी रेबीज वॅक्सिंन घ्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत