HEADLINE

Breaking News

डॉ. पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विधी साक्षरता व्याख्यानांचे आयोजन



डॉ. पतंगराव कदम आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज पेणमधील विधी साक्षरता मंडळ तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०६ डिसेंबर २०२३ रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी तरुणांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी तसेच मानवी हक्क म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी पेण वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. भगवान म्हात्रे यांनी मानवी हक्क या विषयावर मौलिक मार्गदर्शन केले. मानवी हक्क म्हणजे काय? हे समजून घेत भारतात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्यास कोणकोणत्या यंत्रणा उपलब्ध आहेत? याचा आढावा त्यांनी घेतला. संविधानाने मानवी हक्कांचे संवर्धन करण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत याकडे ॲड. भगवान म्हात्रे यांनी लक्ष वेधले. 

याशिवाय ॲड. महेश देसले यांनी पोक्सो या बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी मार्गदर्शन केले. दिवसेंदिवस स्मार्टफोन व सामाजिक माध्यमांचा वापर वाढत असून त्यामुळे अश्लिलतेचे व पर्यायाने लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. या अत्याचारांचे सर्वाधिक बळी ही लहान मुले असल्याने पोक्सोसारख्या कायद्याची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे अशी भूमिका ॲड. महेश देसले यांनी घेतली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे हे होते. प्राचार्य डॉ. दुधाळे यांनी विधी साक्षरता मंडळ आणि तालुका विधी सेवा समिती या मंचांच्या माध्यमातून तरुणांमध्ये विधीसाक्षरता वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातही असेच कार्यक्रम आयोजित व्हावेत असा आग्रह धरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ विनायक पवार यांनी केले तर प्रास्ताविक डॉ श्रीकांत महादाने यांनी व आभार डॉ. बाळासाहेब सरगर यांनी मानले. याप्रसंगी डॉ मुरलीधर वाघ, डॉ सुनील पवार, प्रा लक्ष्मण कुमारे आणि प्रा. संतोष गुरव तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत