पेण मधील खारपाले टाकाची वाडी येथील आदिवासी समाजाचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश, वंचितच्या युवक आघाडीचा पुढाकार
वावोशी/जतिन मोरे :- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली 'गाव तिथे शाखा' या संकल्पनेतून पेण तालुक्यातील खारपाले टाकाची वाडी येथील आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश केला यावेळी या ठिकाणी वंचित चे जिल्हा सदस्य मारुती शिंदे व पेण तालुका युवक अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून आज वंचित, बहुजन समाजाला आपला विकास साधायचा असेल तर त्यांच्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही या विचाराने पेण तालुक्यातील खारपाले टाकाची वाडी येथील आदिवासी समाजाने त्यांचे नेतृत्व स्विकारले आहे. गावचे मुख्य निवासी नारायण हरी वाघमारे व सर्व ग्रामस्थ यांनी वंचित बहुजन आघाडी युवा मध्ये जाहीर प्रवेश केला. Tho खारपाले टाकाची वाडी येथे वंचित बहुजन आघाडीच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष व दिव्यांग संघटनेचे महाराष्ट्र समन्वयक ॲड. सचिन गायकवाड, पेण तालुका युवक अध्यक्ष संजय गायकवाड, महासचिव प्रदीप गायकवाड, पनवेल तालुका महिला अध्यक्षा पुष्पांजली सकपाळ, पेण तालुका महिला अध्यक्षा अश्विनी ठाकूर, महासचिव अंकिता शिंदे, दीप्ती यादव, शशिकला गायकवाड, अंकिता जंगम, रेखा सिंग, नरेश गायकवाड, सुनील शिंदे तसेच खारपाले शाखा कमिटी अध्यक्ष विजय वाघमारे, उपाध्यक्ष संतोष वाघमारे, महासचिव रोशन पवार, सचिव प्रवीण नाईक, संघटक बारक्या वाघमारे, सल्लागार भाऊ वाघमारे, सदस्य समीर नाईक, कैलास पवार, चंद्रकांत वाघमारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत