वंचितचा झंझावात खालापूरात कायम ; धामणी सह माणकीवली ग्रामशाखेचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान व पक्षप्रवेश सोहळा संपन्न
वंचितचा झंझावात खालापुरात कायम ; धामणी सह माणकीवली ग्रामशाखेचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान व पक्षप्रवेश सोहळा संपन्न
देशात लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असून कुटिलनीतीचे राजकारण संपूर्ण देश अनुभवत आहे. देशाच्या राजकारणात उलथापालथ आणि पक्षांतराचे सत्र सुरु आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर शेवटचा घटका मोजत असताना मात्र वंचित बहुजन आघाडी पक्ष जनतेच्या पसंतीस उतरत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन सभांना जनतेचा प्रचंड प्रतीसाद मिळत आहे. महाराष्ट्रात तिसरी आघाडी निर्माण करण्याची ताकद वंचित बहुजन आघाडी या पक्षात श्रद्धेय्य बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात असताना मात्र देशहिताची भूमिका कायम ठेऊन वंचित बहुजन आघाडी पक्ष आपलं राजकारण देशाच्या व लोकशाहीच्या अभिरक्षनार्थ करत आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हेच वंचित बहुजन आघाडीचे ध्येय्य उराशी बाळगून, वंचितचा झंझावात कायम ठेवत वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष सन्मानीय प्रदीप ओव्हाळ, उत्तर रायगड जिल्हा महासचिव सन्मानीय वैभव केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण भालेराव, वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुका महासचिव उत्तम ओव्हाळ यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुका युवा अध्यक्ष प्रशांत गायकवाड वंचित बहुजन आघाडी खालापूर तालुका युवा महासचिव महेंद्र ओव्हाळ यांच्या सहकार्याने खालापूर तालुक्यातील धामणी आणि माणकीवली या गावात २० फेब्रुवारी २०२४ रोजी 'गाव तेथे शाखा, शाखा तेथे कार्यकर्ता' या संकल्पनेतून वंचित बहुजन आघाडीच्या ग्रामशाखेचे उद्घाटन व शाखा नामफलक अनावरण सोहळा वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष अमित गायकवाड, रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सचिन गायकवाड, जिल्हा संघटक आशिष जाधव यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण लक्ष्मण भालेराव यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढला असून त्यांच्या नेतृत्वात खालापूर तालुक्यात ग्रामशाखा उद्घाटनाचे सत्र सातत्याने सुरु आहे. प्रवीण भालेराव हे आहोरात्र मेहनत घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. भविष्यकाळात प्रत्येक गावात शाखा व्हावी असे त्यांचे स्वप्न आहे. पुढील टप्यात आणखीन १० नियोजित शाखांचे उदघाटन ते करणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामशाखेचे उद्घाटन व शाखा नामफलक अनावरण सोहळ्या प्रसंगी धामणी ग्रामशाखेच्या कार्यकारिणी पदी मा. केतन काशिनाथ मनेर(अध्यक्ष), मा. योगेश वालकु मनेर(उपाध्यक्ष), मा. रविंद्र मारूती मनेर(महासचिव), मा. राहुल रामचंद्र मनेर(कोषाध्यक्ष) मा. प्रफुल्ल काशिनाथ मनेर(सेक्रेटरी), मा. काशिनाथ धोंडू मनेर(सल्लागार) अशी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
तसेच माणकीवली ग्रामशाखेच्या कार्यकारिणी पदी मा. अक्षय मारूती दबडे (अध्यक्ष), मा. विलास शांताराम वाघमारे (उपाध्यक्ष), मा. प्रविण अरूण दबडे(महासचिव), मा. वैभव मोतीराम दबडे(कार्याध्यक्ष) मा. विकास दामोदर दबडे(सचिव), मा. कामेश जगन्नाथ गायकवाड(सहसचिव) मा. सुरज भिमराव दबडे(संपर्कप्रमुख), विष्णु बाळु वाघमारे(संघटक), अनिल दत्तात्रेय गायकवाड(संघटक) अशी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
शाखा उदघाटन सोहळ्या प्रसंगी रायगड जिल्ह्या अंतर्गत रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी यांच्या सूचनेनुसार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विकास मणेर(सावरोली जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष), पंकज गायकवाड(चौक जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष), अतिश सोनावणे(खरीवली पंचायत समिती विभाग अध्यक्ष), विनोद गायकवाड (साजगाव पंचायत समिती विभाग अध्यक्ष), रोशन डोंगरे(वडगाव पंचायत समिती विभाग संघटक), रुपेश दीपक गायकवाड(तालुका उपाध्यक्ष), मंगेश सावंत(तालुका उपाध्यक्ष), ऍड. आकाश कांबळे(कायदेशीर सल्लागार) पदी यांची नियुक्ती करण्यात आली.
या ग्रामशाखा उद्घाटन सोहळ्याला आदिवासी बिरसा ब्रिगेड चे साजगाव विभाग अध्यक्ष रवी वाघमारे, भीमा वाघमारे, वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सचिन गायकवाड, जिल्हा संघटक आशिष जाधव, सचिन कांबळे रसायनी विभाग अध्यक्ष, खालापूर तालुका संघटक सुमेध जाधव, खालापूर तालुका युवा उपाध्यक्ष रोहित पवार, खालापूर तालुका सचिव हृतिक गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र निकाळजे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव दीपक कांबळे, भारतीय बौद्ध महासभा खालापूर तालुका सरचिटणीस जगदीश कांबळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव राजू मोरे, भारतीय बोद्ध महासभा खालापूर ता. संस्कार उपाध्यक्ष राम डोंगरे, वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका महिला अध्यक्षा पुष्पांजली सकपाळ, पनवेल तालुका युवा अध्यक्ष प्रभाकर जाधव, पनवेल तालुका युवा सचिव तुषार कांबळे, पेण तालुका युवा अध्यक्ष संजय गायकवाड, पेण तालुका महिला अध्यक्ष आश्विनीताई ठाकूर, पेण तालुका युवा महासचिव प्रदीप गायकवाड, पेण तालुका युवा उपाध्यक्ष नारायण वाघमारे, पेण शहर संपर्क प्रमुख सुनील पंते, पेण शहर खजिनदार योगेश खरात, उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे, सुधागड तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, सुधागड तालुका महासचिव आनंद जाधव, चावंडोली ग्रामशाखा उपाध्यक्ष मंगेश चितळे, चावंडोली ग्रामशाखा युवा सचिव दीपक गायकवाड, कुंभिवली ग्रामशाखा अध्यक्ष संजय गायकवाड, कुंभिवली ग्रामशाखा महासचिव गणेश यादव, कुंभिवली ग्रामशाखा सचिव दिनेश यादव, कुंभिवली ग्रामशाखा सल्लागार चंद्रकांत ओव्हाळ, कुंभिवली ग्रामशाखा कार्याध्यक्ष सचिन वासकर, कुंभिवली ग्रामशाखा संघटक मनोज गायकवाड, आडोशी ग्रामशाखा अध्यक्ष राजेंद्र चागु भालेराव, आडोशी ग्रामशाखा सचिव संजय बाळाराम क्षिरसागर, आडोशी ग्रामशाखा संघटक सुजल संजय क्षिरसागर, आडोशी ग्रामशाखा संपर्कप्रमुख करण राजेंद्र भालेराव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम दबडे, मुकुंद तांबे, मोतीराम दबडे, विशाल गायकवाड, पत्रकार संतोष गोतारने, विशाल वाघमारे, उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत