सुधागड तालुक्यातील मुख्याध्यापिकेचा प्रताप शिक्षणाचा आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीला घर कामाला जुंपले
पाली/ सुधागड - सुधागड तालुक्यातील एका शाळेतील मुख्याध्यापिकेने घरकाम करण्याकरता मुली मिळत नसल्याकारणाने शाळेतीलच एका अल्पवयीन गरीब गरजू विद्यार्थिनीला तुझा पुढील शिक्षण करतो असं अमिष दाखवून घरी घरकाम करण्यासाठी आणले. अनेक महिने मुलीकडून घरकाम करून घेतल्यानंतर या शिक्षिकेने दिलेला शब्द न पाळता मुलीला तिच्या घरी कुठलाही बिदागी न देता तसेच पाठवले. यामुळे या विद्यार्थिनीचे आई-वडील प्रचंड तणावात आहेत तसेच विद्यार्थीनीची देखील मानसिक हानी झालेली आहे. याबाबत अल्पवयीन मुलींना कामावर ठेवणे तसेच तिच्या शिक्षणाच्या बाबतीतआमिष दाखवून तिची फसवणूक करण्या बाबतीत लवकरच पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती लवकरच साप्ताहिक जनतेची जत्रा आपल्यासमोर आणणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत