HEADLINE

Breaking News

अतिवृष्टीचा पशुपक्ष्यांना फटका कुंडलिका नदी प्रवाहात वाहत आलेल्या समुद्री घारीला जीवदान





अमित गवळे 


पाली, ता. 26 (वार्ताहर) कुंडलिका नदी प्रवाहात कोलाड येथील बोटिंग केंद्राजवळ वाहत आलेल्या एका समुद्री घारीला येथील वन्यजीव राक्षकांनी जीवदान दिले आहे. 

    ही समुद्री घार आश्रयासाठी कोलाड येथील कुंडलिका नदी किनाऱ्यावरील बोटिंग जवळील शेड मध्ये स्वतःच्या बचाव करण्यासाठी थकलेल्या स्थितीत बसली होती. भिजल्यामुळे तिला उडता येत नव्हते. उडण्याच्या प्रयत्नात  ही घार पुन्हा पाण्यात पडली त्यानंतर वन्यजीव रक्षक व टीम SVRSS चे सदस्य सागर दहिंबेकर व प्रयाग बामुगडे यांनी या घारीला सुरक्षित पकडले, ड्रायर च्या साह्याने तिचे पंख सुकवून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून दिले. मुसळधार पावसाचा अनेक पशुपक्ष्यांना फटका बसत आहे असे सागर दहिंबेकर यांनी सांगितले. 



फोटो ओळ, पाली, कुंडलिका नदी किनारी बसलेली  समुद्री घार 


फोटो ओळ, समुद्री घारीसोबत वन्यजीव रक्षक सागर दहिंबेकर 


फोटो ओळ, समुद्री घारीला सुरक्षित अधिवासात सोडताना वन्यजीव रक्षक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत