जांभीवली गावातील महिलांचा स्वच्छता अभियान उपक्रम यशस्वी, टाटा स्टील फाउंडेशनचे सहकार्य
![]() |
| महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवशक्ती ग्रामसंघातर्फे स्वच्छता मोहीम राबवली |
महात्मा गांधी जयंतीनिमित्त जांभीवलीत स्वच्छता मोहीम, शिवशक्ती ग्रामसंघाचा पुढाकार
वावोशी/जतिन मोरे :- महात्मा गांधी जयंतीनिमित्त जांभीवली येथील शिवशक्ती ग्रामसंघातील महिलांनी गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. टाटा स्टील फाउंडेशनच्या दिशा उपक्रमातून प्रेरणा घेत महिलांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ४ दिवसांच्या नेतृत्व प्रशिक्षणामुळे त्यांना नेतृत्व कौशल्य व समुदाय सहभागाचे महत्त्व समजले व त्यांनी गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केला.
या उपक्रमाकरिता टाटा स्टील फाउंडेशनकडून स्वच्छता करण्याकरिता साहित्य पुरविण्यात आले होते. यावेळी ग्रामसंघातील महिलांनी सर्व ग्रामस्थांना या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने गावातील सर्व महिला या स्वच्छ्ता अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. यावेळी या उपक्रमाला गावातील सर्व नागरिकांचे देखील सहकार्य मिळाले. यावेळी या कार्यक्रमाला टाटा स्टील फाउंडेशनच्या असिस्टंट मॅनेजर हिमाद्री यादव, शिवशक्ती ग्रामसंघाच्या अध्यक्षा करुणा कदम, ग्रामसंघाच्या खजिनदार अर्चना दळवी, लिपिक जयवंती शिर्के, ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी मोरे, डाटा ऑपरेटर रूपाली पाटील तसेच दिशा कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी व शिवशक्ती ग्रामसंघातील सर्व महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत