HEADLINE

Breaking News

ग. बा वडेर शाळेच्या आयुष विजय जाधव. याचा विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक





पाली / वाघोशी ( अमित गायकवाड )  दि 9: सुधागड तालुक्यातील महागाव येथे राहणारा आयुष याने विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवला .
श्री राज एज्युकेशन सेंटर इंग्रजी माध्यम शाळा घोटावाडे यांनी 52 वे तालुका स्थरीय विज्ञान प्रदर्शन 2024/25 आयोजित केले होते .ही स्पर्धा 2 व 3  जानेवारी 2025 मध्ये सम्पन्न झाली या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता विविध वैद्यनिक प्रदर्शन केली यामध्ये 9 ते 12  या गटात गा. बा. वडर शाळेतील इयत्ता 11 विचार सायन्स मध्ये शिकणारा आयुष विजय जाधाव याने फायर फायटिंग रोबोटीक कर बनवून प्रदर्शन केल्याने  त्यास प्रथम क्रमांक देण्यात आला. 
यावेळी त्याच्या सोबत पाली ग. बा . वडर शाळेचे बार्मुख सर व काटकर सर हे शिक्षक  उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे उदघाटन  पेन सुधागडचे आमदार रवीशेट पाटील , तहसीलदार उत्तम कुंभार , गटविकास अधिकारी लता मोहिते . गटशिक्षण अधिकारी साधुराम बांगरे , विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शांताराम बेलेसे,  प्राचार्य युवराज महाजन , अनिता अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मंदार सिंडकर शाळेच्या प्राचार्य वैशाली पांडे हे उपस्थित झाले होते . 
आयुष हा अत्यंत दुर्मिळ डोमगरपट्टीत राहणारा विद्यार्थी असून त्याने केलेल्या कामगिरi बाबत त्याचे त्यालुक्यातून सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत