HEADLINE

Breaking News

पनवेल महानगरपालिके मार्फत बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने लावलेल्या जाहिरात फळकांबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक

महानगरपालिके मार्फत बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने लावलेल्या जाहिरात फळकांबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक


दिनांक: ०२ ऑगस्ट २०२३

पनवेल: वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना महानगरपालिके मार्फत बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने लावलेल्या जाहिरात फळकांबाबत निवेदन देण्यात आले.
खारघर सेक्टर 07 हिरानंदानी चौकात आज अनेक वर्ष स्थानिक जनतेच्या सोबत भारिप बहुजन महासंघा मार्फत व नंतर वंचित बहुजन आघाडी मार्फत देशाचे राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी तसेच सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी चे कार्यक्रम साजरे केले जात असतात, परंतु महानगरपालिकेने जाणीव पूर्वक त्या ठिकाणी जाहिरातीचे फलक लावून ती जागा अडविण्याचा प्रयत्न केला आहे.
आज अनेक वर्ष त्या ठिकाणी कार्यक्रम होत असताना त्या जागेबाबत खारघर मधील बौद्ध, मराठा, कुणबी, माळी, चर्मकार,मातंग समाजातील जनतेच्या भावना अत्यंत संवेदनशील आहेत. आणि महानगरपालिके मार्फत हा प्रकार झाल्या नंतर सर्व नागरिकांचा रोश उफाळून आला आहे, म्हणून सदर जाहिरात फलक हटविण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना आज निवेदन देण्यात आले. सदर जाहिरात फलक हटवीला गेला नाही तर या सर्व समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात खारघर मधील हा जनसमुदाय वंचित बहुजन आघाडी मार्फत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल असा ही इशारा सन्माननीय पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आला आहे.
सदर निवेदन देताना पनवेल महानगरपालिका सहआयुक्त मा.विधाते साहेब समवेत वंचित बहुजन आघाडी पनवेल तालुका अध्यक्ष मा.दिपक कांबळे, पनवेल तालुका उपाध्यक्ष मा.भीमराव गायकवाड, खारघर अध्यक्ष मा.राहुल वानखेडे तसेच पनवेल तालुका कोषाध्यक्ष मा.चंद्रकांत जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत