HEADLINE

Breaking News

माणगाव तालुका प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने संपन्न....

माणगाव तालुका प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताह मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने संपन्न



     बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) माननीय रायगड जिल्हा अधिकारी डॉ योगेश म्हसे साहेब यांच्या निर्देशान्वये माणगाव तालुक्यात महसूल सप्ताह विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महसूल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदीपान सानप साहेब यांच्या हस्ते "राज्य पुप्प वृक्ष जारुळ" तथा ताम्हण चे तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सोबत तहसीलदार माणगाव श्री विकास गारुडकर, अपर तहसीलदार श्री विनायक घुमरे, तहसीलदार महसूल अरविंद घेमुड, वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे, माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदिपान सानप माणगाव तहसील कार्यालयातील गरुड झेप अभ्यासिके मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, सोबत तहसीलदार माणगाव श्री विकास गारुडकर, अप्पर तहसीलदार श्री विनायक घुमरे उपस्थित होते. महसूल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी माणगाव तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात अभिलेख कक्ष अद्यावतीकरणाचे काम करताना महसूल कर्मचारी. माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदिपान सानप व तहसीलदार माणगाव यांनी अभिलेख कक्ष अद्यावतीकरण करण्याच्या कामाचा आढावा घेतला. 

      महसूल सप्ताहाचा शुभारंभ दीप प्रज्वलाने माननीय उपविभागीय अधिकारी श्री संदिपान सानप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी तहसीलदार माणगाव श्री विकास गारुडकर , अप्पर तहसीलदार श्री विनायक घुमरे, नायब तहसीलदार उपविभागीय अधिकारी कार्यालय श्री दीपक पाटील, निवासी नायब तहसीलदार श्री विपुल ढुमे, नायब तहसीलदार महसुली श्री अरविंद घेमूड, पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस स्टेशन श्री राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी श्री संदीप जठार, मुख्याधिकारी माणगाव नगरपंचायत श्री संतोष माळी व सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते. माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदिपान सानप महसूल सप्ताहाची रुपरेषा सांगताना महसूल सप्ताहाच्या प्रथम दिवशी तहसील कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी माननीय उपविभागीय अधिकारी माणगाव श्री संदीपन सानप, तहसीलदार माणगाव श्री विकास गारुडकर, अपर तहसीलदार श्री विनायक घुमरे, सर्व कार्यालयाचे विभाग प्रमुख, सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते. 

       महसूल सप्ताह अंतर्गत बुधवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी माणगाव तथा १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ मतदार नोंदणी अधिकारी माननीय डॉ संदीपान सानप साहेब, तहसीलदार माणगाव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी माननीय श्री विकास गारुडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत द ग तटकरे महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर आणि युवा संवाद व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेण्यात आले. सदर शिबिरात ६६ नवीन मतदार नोंदणी फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच सदर कार्यक्रमात मतदार साक्षरता मंडळ स्थापन करून नोडल अधिकारी कॅम्पस अम्बेसिडर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्रमास माननीय अप्पर तहसीलदार माननीय श्री विनायक घुमरे, नायब तहसीलदार माननीय श्री अरविंद घेमुड व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अशा प्रकारे माणगाव तालुक्यात महसूल सप्ताह विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत