HEADLINE

Breaking News

युनिटी फ्रेंड्स ग्रुप पाली यांच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी विद्यार्थी दहावी १९९६ बॅच ग. बा. वडेर पाली




| पाली | |प्रतिनिधी| 

सुधागड महागाव तालुक्यातील पंचक्रोशीतील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेना युनिटी फ्रेंड्स ग्रुप पाली ग. बा. वडेर हायस्कूल दहावी बॅच सन १९९६ यांस कडून शैक्षणिक साहित्य वाटप शनिवार ता १९ ऑगस्ट रोजी करण्यात आले. महागाव पंचक्रोशीतील रा.जि.प.शाळा महागाव, लोलगेवाडी वाडी, देउलवाडी, कवेलेवाडी आश्रम शाळा पडसरे, वरवणे हायस्कूल तसेच याच परिसरातील महागाव, लोळगेवाडी, भोप्याची देऊळवाडी , कवेलावाडी, कोंडप,पडसरे अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना वह्या ,पेन, पेन्सिल,पाट्या,स्कूल बॅग किट साहित्य वाटप खुर्च्या घड्याळ, बैठक पट्ट्या . बिस्कीट पुडे, चॉकलेट यांसारखा देवाणघेवाण शैक्षणिक व शालेय साहित्य वाटप केले. कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र लिमये यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत अशा प्रकारचे गेट-टुगेदर शाळेचे माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते गणेश चोरघे यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंगेश कडव, बाळकृष्ण भोईर, मंगेश लखिमळे, सुजित बारस्कर, परेश घरत रवींद्र घायले, श्रीकांत मोरे 1. अयाज पानसरे, योगेश तुरे सुशील पोतदार गणेश कोंजे, विनायक सोडिये, निलेश जाधव महेश  ठोंबरे, मंगेश ठोंबरे, राजेंद्र महाडिक तसेच सर्व अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शिक्षक जुन्या महागाव पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांच्या वतीने गणेश चोरगे यांचे विशेष आभार व्यक्त केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत