खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे किल्ले माणिकगड रसायनी येथे स्वच्छता अभियान
| खालापूर || राजेश गायकवाड |
महाराष्ट्र शासन आयोजित औद्योगिक प्रशिक्षण संस्था तथा कौशल्य रोजगार उद्योजकता यांचे विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त गड किल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्था खालापूर तर्फे रसायनी येथील वाशिवली जवळ असणाऱ्या अतिदुर्गम गिरीदुर्ग विभागात मोडणाऱ्या माणिक गडाचे स्वच्छता अभियान खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थे मार्फत राबविण्यात आले. सदर किल्ल्याचे साफसफाई साठी वेध सह्याद्रीचे शिलेदार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी यांनी संयुक्तरीत्या भाग घेऊन स्वच्छता अभियान पार पाडले या अभियाना साठी गटनिदेशक गिरीश पाटील सर ,रुपेश जाधव सर ,व शिपाई महादू पवार ,सुरक्षा रक्षक राजेश गायकवाड, विशाल वाघमारे यांच्या समवेत प्रशिक्षणार्थी यांनी भाग घेतला.सदर गडावर चुन्याचा घाणा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे छोटेखाणी मंदिर, तसेच किल्लेदारांचा वाडा ,आणि सदरावरील गवत पाण्यात साचलेला गाळ तसेच आजूबाजूचा परिसर साफ करून विद्यार्थ्यांनी श्रमदान केले .यावेळी त्यांच्यासोबत वेध सह्याद्रीचे सुनील शिंदे व त्यांचे सवंगडी यांनी किल्ल्याच्या परिसरातील व किल्ल्यावरील सर्व माहिती विद्यार्थ्यांना सांगितली तसेच किल्ल्यावरती विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आले. सदर स्वच्छता अभियान करता खालापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री बारगळ साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत