HEADLINE

Breaking News

पक्षविरोधी काम केल्यास कडक कारवाई केली जाईल!! वंचित चे महासचिव वैभव केदारी यांचा पक्षातील कार्यकर्त्यांना इशारा.

 






  परळी( प्रतिनधी ) सुधागड तालुक्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या रणधुमाळी मध्ये तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यापैकी अजनेक  ग्रामपंचायत मध्ये वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. सुधागड तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड व महासचिव आनंद जाधव यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्या ज्या ग्रामपंचायत मध्ये वंचित आघाडीचे उमेदवार उभे आहेत. त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये तेथील स्थानिक पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी पक्षाचे उमेदवार कसे निवडून येतील याकरता प्रयत्न केले पाहिजे. आपापसातील मतभेद विसरून बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला हे केलंच पाहिजे.  सुधागड तालुक्यात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मोठ्या प्रमाणात वाढ घेत असून या निवडणुकीमध्ये जर कोणी पक्ष विरोधी काम करत असेल.  तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. असे प्रतिपादन रायगड जिल्हा महासचिव वैभव केदारी यांनी चंदरगाव येथील शाखा उद्घाटनाप्रसंगी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत