सुधागड तालुक्यामध्ये, सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
पाली (प्रतिनिध ) सुधागड तालुक्यामध्ये, सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने तालुक्यातील तमाम बौद्ध अनुयायी उपस्थित होते. तथागत बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह पाली ते संपूर्ण पाली बाजारपेठेतून शांतता रॅली काढण्यात आली.
रॅली संपन्न झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहपाली येथे डॉक्टर भगवान माधवराव लोखंडे एम. ए .एन ए टी. पी एच डी. यांनी उपस्थित तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना प्रबोधन केले. आलेल्या सर्व बौद्ध बांधवांना खीर व जेवणाचे वाटप करण्यात आले.
14 ऑक्टोबर 1956 रोजी भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅक्टर भीमराव आंबेडकर (Dr Babasaheb Aambedkar) यांनी त्यांच्या 3 लाखांहून अधिक अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला. ज्या दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली त्याचं दिवसाला धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhammachakra Paravartan Din) असं म्हणतात. धर्मांतर 14 ऑक्टोबर रोजी झाले असले तरी, धम्मचक्र प्रवर्तन दिन, जो कार्यक्रम चिन्हांकित करतो तो दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दसरा 24 ऑक्टोबरला (October) असल्याने साजरा केला .
या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायतीचे तालुका अध्यक्ष भगवान रामचंद्र शिंदे, तालुका सचिव राजेश गायकवाड, सुधागड तालुका बोध्दजन पंचायतीचे माजी अध्यक्ष प्रभाकर गायकवाड, सुप्रीम कमिटीचे माजी अध्यक्ष छनक शिर्के, ज ज्येष्ठ बौद्धाचार्य नारायण जाधव, दीपक पवार, रमेश साळुंखे सरपंच, आदी पदाधिकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत