HEADLINE

Breaking News

पनवेल तालुका कमिटीच्या मार्गदर्शनात मोठया उत्साहात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे उदघाटन संपन्न.




पनवेल: वंचित बहुजन आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन. आज (29 ऑक्टोबर) पनवेल तालुक्यात सुकापूर या गावात अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला असून सर्व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अत्यंत निष्ठेने पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष मा.प्रदिप ओव्हाळ साहेब यांच्या हस्ते पक्षाच्या नामफलकाचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले तसेच त्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या वाढी संदर्भात अत्यंत महत्वाच्या सूचना दिल्या. पनवेल तालुका महासचिव मा. नितीन गायकवाड यांनी पक्षाची धैर्य धोरनांचा योग्य पद्धतीने पालन करून, पक्षाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, तसेच पक्षाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्या संदर्भात सूचना देऊन आपल्या भाषणाची समाप्ती केली.

पनवेल तालुका कोषाध्यक्ष मा.चंद्रकांत जाधव यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देत असताना आपली संघटना एकीने संघटित ठेवण्याचे निर्देश दिले, तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आणखी 4 ठिकाणी पक्ष प्रवेश आणि उदघाटन कार्यक्रम घेणार असून शेकडो कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. आणि त्या कार्यक्रमांसाठी आपण सर्वांनी एकीने सज्ज राहण्याची गरज आहे असे निर्देश देण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा महासचिव मा.वैभव केदारी, रायगड उपाध्यक्ष मा.प्रदिप कांबळे, दक्षिण रायगड महासचिव मा.भालेराव, रायगड जिल्हा सचिव मा.अँड हेमंत शिंदे, खारघर अध्यक्ष मा.राहुल वानखेडे, माजी पनवेल विधानसभा अध्यक्ष मा. दिलीप भंडारे,महेश राऊत, असे शेकडो कार्यकर्ते  उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत