HEADLINE

Breaking News

पाऊस आला धावून!! सुधागड पंचायत समितीचा रस्ता गेला वाहून!!!!

पाली - सुधागड तालुक्यातील पंचायत समिती आवारातील अंतर्गत काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नुकताच केलेल्या रस्त्याचं सिमेंट वाहून गेलेला आहे. वाहून सिमेंट वाहून गेल्या कारणाने रस्ता किती काळ टिकेल याबाबत शंका वाटत आहे. 


सुधागड तालुक्याचा सर्व ग्रामपंचायतचा आरसा समजला जाणारी पंचायत समितीचे कार्यालय पाली या ठिकाणी आहे. या ठिकाणी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात आला आहे. काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्टरला इतकी घाई होती की त्यांनी पाऊस थांबण्याची वाट पाहिली नाही. त्यामुळे भर पावसात केलेले काँक्रीट च काम अत्यंत ढिसाळ झालं आहे .


 कारण काम सुरू असताना आलेल्या पावसाने काँक्रेट मधील सिमेंट वाहून जाऊन एका ठिकाणी जमलं आहे. त्यामुळे हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला असून याबाबत पंचायत समिती प्रशासन बांधकाम विभाग काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण सुधागड तालुक्याचं लक्ष लागलं आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत