HEADLINE

Breaking News

मृगगड श्रमदान मोहीम फत्ते महत्वाची सदर केली मोकळी




अमित गवळे 


पाली, ता. 26 (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील भेलीव सावे गावाजवळ असलेल्या ऐतिहासिक महत्वाच्या मृगगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे नुकतीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. यावेळी गडावरील कित्येक वर्ष दगड मातीत खितपत पडलेली एक महत्वाची वास्तू म्हणजे सदर उजेडात आणून, त्या वास्तूचा एक भाग दगड मातीतून मोकळा करण्यात आला आहे.

   मुसळधार पावसात ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन विभागात टीम चे विभाजन करून कामाला सुरुवात केली गेली. यातील एका टीम ने ही सदर उजेडात आणली तर दुसऱ्या टीम ने गडावर जी जोती आहेत त्यावर वाढलेलं गवत काढून ती जोती साफ केली. या मोहिमेत 20 शिलेदारांनी सहभाग घेतला होता. मागील अनेक वर्षांत दुर्गवीर च्या शिलेदारांनी मृगगडावर साफसफाई करणे, गडावरील पायवाटा स्वच्छ करणे, टाक्या साफ करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, गड सुरक्षितपणे चढण्यासाठी धातूचे रोप लावणे, दिशादर्शक व माहिती फलक बसविणे अशा प्रकारची महत्वाची कामे पुर्णत्वास नेली आहेत.



फोटो ओळ, पाली, मृगगड श्रमदान मोहीमेत काम करतांना दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य.  (छायाचित्र, अमित गवळे)




फोटो ओळ, पाली, मृगगड श्रमदान मोहीमेत सहभागी दुर्गवीर प्रतिष्ठानचे सदस्य.  (छायाचित्र, अमित गवळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत