HEADLINE

Breaking News

श्री राज एज्युकेशन सेंटरच्या कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा पगार वाढ व सर्व सुट्ट्या मिळणार मनसे कामगार सेनेचे युनिट स्थापन

 



अमित गवळे 


पाली, ता. 1 (वार्ताहर) सुधागड तालुक्यातील श्री राज एज्युकेशन सेंटरच्या कर्मचाऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मनसेच्या माध्यमातून येथील शाळा व कॉलेजमध्ये कार्यरत सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, चालक व विविध विभागाचे कामगारांना न्याय मिळाला आहे. त्यांना पगार वाढ व सर्व सुट्ट्या मिळणार आहेत. त्या अनुषंगाने रविवारी (ता.28) येथे मनसे कामगार सेनेचे युनिट स्थापन करण्यात आले आहे.  

     मनसे सुधागड तालुका अध्यक्षा हर्षदा शिंदे यांनी सांगितले की येथे कार्यरत असलेले हाऊस्किपर, शिक्षक, चालक व कामगार यांची कित्येक वर्षे पिळवणूक केली जात होती. पूर्ण दिवस काम करून हजेरी फक्त 160 ते 240 रुपये एवढीच दिली जात होती. मेडिकल इन्शुरन्स, वार्षिक सुट्टी न मिळणे अश्या इतर अडचणी देखील होत्या. घडणारा प्रकार या कर्मचाऱ्यांनी मनसे तालुका अध्यक्षा हर्षदा शिंदे यांना सांगितला. याची दखल घेऊन घेऊन हर्षदा शिंदे यांनी महाराष्ट्र सरचिटणीस स्नेहल जाधव, 

रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, 

रायगड जिल्हा अध्यक्षा सपना राऊत यांच्या माध्यमातून कामगार सेनेचे महाराष्ट्र सरचिटणीस गजानन राणे यांच्याशी संपर्क करून कामगारांना न्याय मिळून दिला. 

कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासत्व स्वीकारून रविवारी (ता.28) येथे युनियन बोर्ड चे उदघाट्न करण्यात आले. 

    या कार्यक्रमासाठी मनसे कामगार सेना महाराष्ट्र सरचिटणीस गजानन राणे, सरचिटणीस स्नेहल जाधव, कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, सुधागड तालुका सचिव सचिन झुंजारराव, सुधागड तालुका अध्यक्षा हर्षदा शिंदे व श्री राज एज्युकेशन सेंटर कॉलेज मधील महिला कामगार आणि पदाधिकारी उपस्थित होते. 




फोटो ओळ, पाली, युनियन बोर्ड चे उदघाट्न कार्यक्रमावेळी उपस्थित मनसे पदाधिकारी, कर्मचारी महिला व श्री राज एज्युकेशन सेंटरचे पदाधिकारी. (छायाचित्र, अमित गवळे) 



फोटो ओळ, पाली, मनसे पदाधिकारी कर्मचारी महिला व श्री राज एज्युकेशन सेंटरचे पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करतांना. (छायाचित्र, अमित गवळे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत