बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी, सुधागड उबाठा शिवसेनेने केला निषेध व्यक्त तहसीलदार, पोलिसांना दिले निवेदन !
पाली : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर
शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडलीय. या घटनेनंतर सर्वत्र संतपाची लाट पसरलीय. या घटनेच्या निषेधार्थ सुधागड तालुका बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने पाली शहरात जाहीर निषेध व्यक्त करत सुधागड - पाली नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे तसेच पाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांना निषेधाचे निवेदन शिवसेनेच्या सुधागड तालुका महिला संघटिका रेशमा
सुरावकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णूभाई पाटील, जिल्हा उपसंघटक, राजेंद्र राऊत, महिला जिल्हा उपसंपर्कप्रमुख अश्विनी रुईकर, युवासना रायगड जिल्हाधिकारी सचिन डोबले, तालुकाप्रमुख दिनेश चीले पाली शहर प्रमुख विद्देश आचार्य, सुधागड तालुका संघटक रमेश सुतार, उपतालुकाप्रमुख किशोर दिघे, उपशहर प्रमुख सुरज गुप्ता, नेत्रा पालांडे, वृषाली खरीवले, अंतरा यादव, विभाग प्रमुख
एकनाथ हलदे, किशोर चौधरी, आधी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते. सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की बदलापूर घटनेत प्रत्यक्ष कृत्य करणारा शाळेचा कर्मचारी याला पोस्को आणि अन्य कायद्याअंतर्गत फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी. त्या कर्मचाऱ्याला संरक्षण देणाऱ्या संस्थाचालक मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्हाला या विरोधात तीव्र आंदोलन उभाराव लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत