HEADLINE

Breaking News

खान्देशी रहिवासी सेवासंघ यांचा स्नेह मेळावा. कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांची वर्णी.


आनंद मनवर 

रायगड जिल्हा प्रतिनिधी.

खान्देशी रहिवाशी सेवा संघ खोपोली तालुका खालापूर येथे रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंगल कार्यलय खोपोली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत - खालापूर तालुक्याचे आमदार मान. श्री महेंद्रशेठ थोरवे उपस्थित होते. या वेळी बोलताना खान्देशी भाषा ऐरणीं भाषा आणि या भाषेचे योगदान महत्वाचे आहे प्रभू श्रीराम व प्रभू श्रीकृष्ण यांनी पदस्पर्श करुन या भूमीला पावन करुन गेले. याच भूमीत महाराष्ट्रचे सुपुत्र तसेच देशाचा स्वातंत्र्य काळापासून देशासाठी झटणारे कामगार, शेतकरी, दिंनदुबडया जनतेचे कैवारी साने गुरुजी, मराठी साहित्याचा जननी बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. यांचे मा. आमदार यांनी स्मरण करुन खान्देशी बांधवाना शुभेच्छा दिल्या. व खंबीर पणे साथ देऊन सर्व समस्या सोडऊ असे ठाम आश्वासन दिले.या कार्यक्रमाप्रसंगी श्री. धर्मराज पाटील यांना खान्देश रत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केले. श्री सुधाकर चव्हाण यांचे स्वलिखित पुस्तकं ' मला जगायचे आहे ' याचे प्रकाशन करण्यात आले. या प्रकाशन वेळी सौ सुनीता विकास निकम यांनी विचार मांडले तसेंच खान्देशांतील गुणवंत विधार्थी यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक, तथा खालापूर शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष श्री संजय पाटील साहेब, संपर्क प्रमुख श्री पंकज पाटील. भावी नगरसेवक श्री ईश्वर कासार साहेब, श्री. विकास निकम सर, श्री गजानन धनगर, श्री सुनील पाटील, जेष्ठ कार्यकर्ते अशोक अहिरे सर व सर्व खान्देशी रहिवासी सेवा संघ खोपोली कमिटी सदस्य, सभासद, पदाधिकारी, तसेच महिला वर्ग, सर्व तालुक्यातील खान्देशी मित्रमंडळी उपस्थित होते.या सगळयांचें स्वागत अध्यक्ष श्री. ईश्वर कासार साहेब यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत