वावोशी ग्रामपंचायतमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे अनावरण, आदिवासी बांधवांना लग्न मंडपाचे साहित्य व खुर्च्यां वाटप
वावोशी ग्रामपंचायतमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे अनावरण, आदिवासी बांधवांना लग्न मंडपाचे साहित्य व खुर्च्यां वाटप
'अवघे २० वर्षे जीवन जगलेला हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा इतिहास हा प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे. - वालचंद ओसवाल'
वावोशी/जतिन मोरे :- 'अवघे २० वर्षे जीवन जगलेला नाग्या महादू कातकरी यांचा इतिहास हा प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे. आपल्या न्याय हक्कासाठी प्रत्येक आदिवासी बांधवांसाठी व पर्यायाने देशासाठी आपले बलिदान अर्पण करणारा हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले याचा आम्हाला अभिमान आहे.' तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील ही प्रतिमा नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन वावोशीचे माजी सरपंच वालचंद ओसवाल यांनी केले. ते हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या पुण्यतिथी निमित्त आपले मनोगत व्यक्त करीत असताना बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला सरपंच आश्विनी शहासने, माजी सरपंच राजू शहासने, उपसरपंच दीपा शिर्के, खालापूर आदिवासी भवनचे अध्यक्ष अनंता पवार, भाजपा खालापूर युवा मोर्चाचे अध्यक्ष नागेश पाटील, पत्रकार जतिन मोरे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डाके, अंकुश वाघ, बबन वाघमारे, एकनाथ पवार, सखाराम वाघमारे, कैलास पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या पुण्यतिथी निमित्त वावोशी ग्रामपंचायतीच्या वतीने हुतात्मा नाग्या कातकरी यांची ९४ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वावोशी चे माजी सरपंच वालचंद ओसवाल, सरपंच आश्विनी शहासने यांच्या हस्ते हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. ज्याप्रमाणे हुतात्मा नाग्या कातकरी हे आपल्या हक्काप्रती जागरूक होते त्याचप्रमाणे आपण सर्व आदिवासी बांधवांनी जागरूक असणे ही काळाची गरज असल्याचे मनोगत भाजपा खालापूर युवा मोर्चाचे अध्यक्ष नागेश पाटील यांनी व्यक्त केले तर "वावोशी ग्रामपंचायतीकडून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अभिमानास्पद असून प्रत्येक आदिवासी बांधवांना हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा इतिहास समजण्यास महत्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन पत्रकार जतिन मोरे यांनी केले तसेच वावोशी चे माजी सरपंच राजू शहासने यांनी हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या बलिदानाचा इतिहास सर्व आदिवासी बांधवांना समजावून सांगितला. त्याचप्रमाणे आदिवासी समाजात लहान वयात होणाऱ्या विवाहाबद्दल व शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली. शेवटी या कार्यक्रमाचे अध्यक्ष वालचंद ओसवाल यांनी या कार्यक्रमाचे आयोजक असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्यांची स्तुती करीत धन्यवाद दिले. यावेळी या कार्यक्रमाचे औचीत्य साधत वावोशी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आदिवासी बांधवांना लग्न मंडपाचे साहित्य व खुर्च्यां वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच आश्विनी शहासने, उपसरपंच दीपा शिर्के, ग्रामपंचायत सदस्य मयूर धारवे, मच्छिंद्र वाघमारे, मंजुळा वाघमारे, रिया वालम, भारती नाईक, ग्रामसेवक विवेक वासकर, सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग मोरे, मारुती नाईक, अंगणवाडी सेविका पल्लवी मोरे, रेखा धारवे, चंद्रकांत वाघमारे, वसंत वाघमारे व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत