HEADLINE

Breaking News

आरपीआय पक्षाच्या पेण तालुका अध्यक्षपदी भाई एल एन सताणे यांची नियुक्ती

 

आरपीआय पक्षाच्या पेण तालुका अध्यक्षपदी भाई एल एन सताणे यांची नियुक्ती

पेण/प्रतिनिधी :- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया १९५६ या पक्षाच्या पेण तालुका अध्यक्ष पदी लक्ष्मण सताणे यांची निवड करण्यात आली आहे. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (१९५६) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करण्याचा संकल्प लक्ष्मण सताणे यांनी केला असून पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीश गायकवाड, कार्याध्यक्ष एम.डी. कांबळे व जिल्हाध्यक्ष अशोक गोतरणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पेण तालुक्याच्या अध्यक्ष पदी सर्वांच्या अनुमते एकमुखाने नियुक्ती करण्यात आली. लक्ष्मण सताणे हे पेण तालुक्यात भाई एल. एन सताणे या नावाने प्रसिद्ध असून त्यांनी यापूर्वी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. त्यामुळे त्यांचा रिपब्लिकन चळवळीशी जवळचा संबंध असून त्यांना सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील कामाचा दीर्घ अनुभव असून आता एकच पर्याय फक्त आरपीआय या अनुषंगाने ते डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाची पेण तालुका कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली. यावेळी पक्षाच्या पेण तालुका उपाध्यक्षपदी भगवान लाटे, सरचिटणीस पदी मिलिंद कांबळे, कोषाध्यक्ष पदी सुभाष कांबळे, सह कोषाध्यक्ष पदी दिगंबर सताणे, संघटक पदी राजेंद्र कांबळे, रविंद्र गायकवाड, विलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून सर्वांना आरपीआयचे कोकण कार्याध्यक्ष एम.डी. कांबळे व जिल्हाध्यक्ष अशोक गोतरणे यांनी पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत