टाटा कॅपिटल, मराठा सेवा रहिवाशी संघामार्फत सुधागड तालुक्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
आनंद मनवर
रायगड जिल्हा प्रतिनिधी.
सुधागड : बुधवार दि २८ऑगस्ट २०२४ रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्याआत्मोन्नती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जांभूळपाडा येथे सुधागड तालुका रहिवासी संघ ठाणे तर्फे टाटा कॅपिटल सी.एस.आर मदतीच्या माध्यमातून प्रोजेक्ट सुविद्या अंतर्गत तालुक्यातील १४ माध्यमिक शाळेतील पितृछत्र हरपलेल्या दिव्यांग व गरीब, गरजू विद्यार्थ्थांना मोफत पुस्तके मोठे रजिस्टर ,वाचनालय पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सु.ता.र. संघाचे अध्यक्ष श्री.विठ्ठल घाडगे साहेब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सरस्वती मातेला हार घालून श्रीफळ वाढवून करणेत आली. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. निकुंभ सर संघाचे समन्वयक श्री. निंबाळकर सर व संघाचे सर्व सहकारी माध्यमिक शाळांचे प्राचार्य तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी संघाचे अध्यक्ष श्री घाडगे साहेब यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपल्या तालुक्यातून एक तरी शासकीय अधिकारी व्हावा, जर का कोणाची तशी इच्छा असेल तर त्या विद्यार्थ्याचा खर्च आम्ही करू. तसेच श्री. निंबाळकर सर, पाच्छापुर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनीही आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर मांडले.साधारण 2005 पासून सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे सुधागड तालुक्यात कार्यरत आहे. टाटा कॅपिटल सी.एस.आर फंडाच्या. माध्यमातून तालुक्यातील विविध शाळांना प्रिंटर,टिव्ही संच,क्रिडा साहित्य देऊन शौचालय सारख्या विविध सुविधा करुन देत आहे, त्यामूळे तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या भौतिक सुविधा पूर्णत्वास येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत