राजाराम मोरे यांच्या कार्याची रायगड जिल्हा परिषदेकडून दखल, 'सहाय्यक गट विकासअधिकारी' पदावर मिळाली बढती
वावोशी/जतिन मोरे :- रायगड जिल्हा परिषद अलिबाग विभागांतर्गत माणगाव पंचायत समितीच्या 'सहाय्यक प्रशासन अधिकारी' या पदावर कार्यरत असणारे राजाराम अनंत मोरे यांच्या कार्याची रायगड जिल्हा परिषद प्रशासनाकडून दखल घेत त्यांना बढती देत माणगाव पंचायत समिती येथे 'सहाय्यक गट विकास अधिकारी' पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
विशेष म्हणजे राजाराम मोरे हे ८ जानेवारी १९९० रोजी माणगाव पंचायत समिती येथे रुजू झाले होते आणि आता त्याच ठिकाणी त्यांना 'सहाय्यक गट विकास अधिकारी' या पदावर बढती देण्यात आली आहे. राजाराम मोरे यांना प्रथम पदोन्नती हि १० ऑक्टोबर २००३ मध्ये बालविकास प्रकल्प विभागात मिळाली होती तर दुसरी पदोन्नती हि १ फेब्रुवारी २०१३ मध्ये म्हसळा पंचायत समिती येथे 'कनिष्ठ प्रशासन अधिकारी' या पदावर देण्यात आली होती. तसेच राजाराम मोरे यांनी सुधागड पाली पंचायत समिती येथे देखील रोखपाल पदावर काम केले आहे. एकंदरीत राजाराम मोरे यांना जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, बालविकास प्रकल्प, ग्रामपंचायत, समाजकल्याण, प्राथमिक शिक्षण विभागात देखील काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांचे कामकाज पाहता प्रशासकिय दृष्टिकोनातून त्यांना ही एक संधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे पंचायत समिती माणगाव आता पर्यंतच्या कार्यकाळात सहाय्यक प्रशासन अधिकारी यास प्रथमत सहाय्यक गट विकास अधिकारी ह्या पदावर श्री. मोरे साहेबांच्या रूपाने संधी मिळाली याचा माणगाव करासह रायगड जिल्ह्यातील त्यांच्या हितचिंतक व समर्थकांना आनंद झाला आहे. राजाराम मोरे हे माणगाव पंचायत समिती मध्ये 'सहाय्यक गट विकास अधिकारी' या पदावर ते २ सप्टेंबर २०२४ रोजी हजर झाले असून त्यांनी या पदाचा अतिरीक्त भार स्विकारला आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रशासकिय कामकाजाची जबाबदारी देखील वाढली असून ते या पदाला योग्य तो न्याय देतील या अपेक्षेने त्यांच्या हितचिंतकांकडून त्यांना अभिनंदनपर शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत