जागतिक महिला दिन आत्मोनती विद्यामंदिर जांंभूळपाडा येथे त्साहात साजरा.
आनंद मनवर
रायगड जिल्हा प्रतिनिधी
पाली - आज दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिवस याचे अवचित्य ठेऊन सुधागड एज्युकेशन संस्थेच्या आत्मोन्नती विद्यामंदिर जांभूळपाडा येथे महिला दिन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. शाळेचे कर्तव्य दक्ष मुख्यध्यापक शाळेला आपल्या कर्तृत्वातून अपार मेहनत घेऊन योग्य मार्गदर्शन करणारे प्राचार्य निकुंभ सर यांनी जागतिक महिला दीना निमित्ताने महिला दिनाचे महत्व आणि मार्गदर्शन केले. या वेळी शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री. साबळे, श्री. वेत्रवान गुरव सर यांनी विध्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाची सुरुवात कुठून झाली ते आजचा महिला सक्षम आणि स्वतःचा पायावर कशा पद्धतीने उभ्या झाल्या व पुरुषांचा खांद्याला खांदा लावून आज घरादारची जबाबदारी कशी घेतली या विषयी सखोल व्याख्यान दिले.तसेच महिला दिनाची सविस्तर माहिती महिला दिनाचा उदय आणि भारतातील सुरुवात महिला दिन साजरा करण्यामागचा हेतू आणि आजची परिस्थिती समाजातील महिलाचे स्थान आज बदललेली परिस्थिती याबाबतची सविस्तर माहिती सूत्रसंचालन करणारे श्री नागठाणे सरांनी आपल्या छोट्याशा भाषणातून व्यक्त केले. या कार्यक्रमचे आभार प्राध्यापिका सौ. जाधव मॅडम यांनी केले तर संपूर्ण कार्यकर्माचे सूत्रसंचालन श्री. नागठाणे सर यांनी केले या वेळी शाळेतील सगळे शिक्षक वृंद, सेवक वर्ग, विध्यार्थी, विध्यार्थिनी पालक वर्ग मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.







कोणत्याही टिप्पण्या नाहीत